सह्याद्री व्हॅली मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

1 min read

राजुरी दि.१६:- राजुरी (ता.जुन्नर) येथील सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी राजुरी येथे ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संचालक सचिन चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माजी चेरमन गणपत कोरडे यांनी स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना.

विद्यार्थ्यांनी नौकरीसाठी बाहेर देशात न जाता इथेच स्टार्टअप सुरू करावेत आणि नोकरी मागणारे न बनता नोकरी देणारे उद्योजक बनावे असे आव्हान विद्यार्थ्यांना त्यांनी केले. आणि आपल्या देशाच्या विकासासाठी त्यांनी त्यांचे योगदान द्यावे पंतप्रधानांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले.

ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक भारतातील व्यक्तीने त्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली. विद्यार्थी हेच आपल्या देशाचे भविष्य आहेत आणि विद्यार्थी सक्षम करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. ज्ञानाने सक्षम झालेले विद्यार्थी उद्याचा विकसीत भारत घडवण्याचे काम करतील.

तद्पुर्वी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गणपत कोरडे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या सर्वाना सुभेच्छा दिल्या. तद्पुर्वी उपप्राचार्य पी. बालारामुडू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना शिक्षणाच्या कमतरतेमुळे सामान्य माणूस पुढे येऊ शकत नाही त्यासाठी शिक्षण घेणे गरजेचे आहे.

आणि त्यानंतर कौशल्यपूर्ण शिक्षण आत्मसात करणे आवश्यक आहे तरच नोकरीचे आणि व्यवसायाचे प्रश्न सुटू शकतात. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हवे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी.  बालारामुडू यांनी केले. तसेच सर्व भारतीयांनी राष्ट्रीय कर्तव्याचे पालन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तद्प्रसंगी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यर्थी, प्राध्यापक व संचालकांनी आपले मते भाषनामधून व्यक्त केली. यावेळी प्रमुख उपस्थिती संचालक गणपत कोरडे, सचिन चव्हाण, नलिनी कोरडे, स्कूलच्या व्यवस्थपिका वर्षा भालेराव, उपप्राचार्य पी. बालारामुडू, स्कुलचे मुख्याध्यापक सचिन डेरे

आणि सहयाद्री व्हॅली ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचा स्टाफ, सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूलचा स्टाफ आणि पालक मोठ्या संखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतीक्षा सोनवणे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन प्राचार्याच्या मार्गदर्शनाखाली प्रा. मयूर घाडगे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे