डॉ. कदम गुरुकुल च्या विद्यार्थांनी रुग्ण, बँक कर्मचारी, पोलिस व झाडांना बांधल्या राख्या 

1 min read

इंदापूर दि.२०:- डॉ. कदम गुरुकुल मधील 3 री ते 5 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शाळेसमोरील परिसरातील झाडांना राखी बांधून निसर्ग हाच आपला रक्षण करता आहे. हा मोलाचा संदेश दिला. तर 6 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी इंदापूर शहरातील इंदापूर पोलीस स्टेशन, एचडीएफसी बँक,

बँक ऑफ महाराष्ट्र,जनता सहकारी बँक, बँक ऑफ इंडिया, डॉ. कदम हॉस्पिटल, डॉ. पानबुडे हॉस्पिटल, डॉ. खाडे हॉस्पिटल, डॉ. मगर हॉस्पिटल, डॉ. वनवे हॉस्पिटल, डॉ. गोरे हॉस्पिटल, डॉ. कर्डिले हॉस्पिटल, डॉ.थोरवे हॉस्पिटल आणि भिमाई आश्रम शाळा या ठिकाणी जाऊन तेथील कर्मचारी

हॉस्पिटल मधील ऍडमिट पेशंट यांना राखी बांधून सामाजिक बांधिलकी काय असते याचे उदाहरण दिले, आणि सामाजिक एक्याची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण केली. हे करत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून येत होता.

या वेगळ्या उपक्रमाची संकल्पना डॉ. कदम गुरुकुलच्या शैक्षणिक संचालिका डॉ. सविता कदम संस्थापक अध्यक्ष डॉ. लहू कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य वृंदा मुलतानी जोशी, उपप्राचार्य ऋषी बासू, स्कूल मॅनेजर संदीप जगताप यांनी राबवली.

यासाठी सर्व वर्गशिक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले आणि हा एक स्तुत्य असणारा वेगळा उपक्रम यशस्वी झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे