आळे येथील मंगलमूर्ती गणपती मूर्ती कारखान्यात विक्रीसाठी १ ते ७ फुटांच्या सुबक मूर्ती

1 min read

आळे दि.२०:- रविवार व रक्षाबंधन सणाच्या सुट्टी असल्याकारणामुळे गणेश भक्तांनी आळे (ता.जुन्नर) येथील मंगलमूर्ती गणपती मूर्ती कारखाना येथे गणपती मूर्ती बुकिंग साठी गर्दी केली होती.

आळे गावात श्रीपाद घाटपांडे यांचा मूर्ती बनवण्याचा कारखाना असून अल्प दरात येथे मुर्त्या मिळतात. एक फुट ते सात फुटापर्यंत विविध स्वरूपात गणेशाच्या मुर्त्या भक्तांना आकर्षित करतात.

महागाईचा फटका यंदा गणपती मूर्त्यांना सुद्धा बसण्याचे चिन्ह असून १५ ते २० टक्याने मुर्त्यांच्या किमती वाढल्या आहेत. तसेच शाडू मातीच्या मूर्त्यांना मागणी वाढली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क:- 7387269107, 9970647399

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे