शिरोलीत १०५ वर्षाच्या आजीने केले ध्वजारोहन

1 min read

बेल्हे दि.१५:- शिरोली तर्फे आळे (ता.जुन्नर) येथे 105 वर्ष वयाच्या ज्येष्ठ आजी लोभाबाई डावखर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या वेळी गावातील शासकीय सेवेमध्ये निवड झालेल्या तरुण-तरुणींचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत, हायस्कूल तसेच प्राथमिक शाळा विद्यार्थी वर्गाच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.

ग्रामपंचायत ने यावर्षी गावातील ज्येष्ठ नागरिकांना ध्वजारोहण कार्यक्रमाला आवर्जून बोलून घेतले होते. या वर्षी गावच्या ज्येष्ठ आजी लोभाबाई डावखर (वय १०५ वर्षे) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तसेच गणपत खिलारी (वय ९८), दत्तात्रय भोर (वय ८८), अनंथा आल्हाट (वय ८५). माणिकबाई चोरडीया (७५) आदी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण संपन्न झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ किशोर मुळे यांनी भूषवले. यावेळी गावच्या सरपंच प्रिया खिलारी, उपसरपंच दत्तात्रय डावखर, ग्रामपंचायत सदस्य, त्यांचे सर्व सहकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण वर्ग. महिला भगिनी, शिक्षक वर्ग, सर्व मुंबईकर पुणेकर मंडळी आणि शिरोलीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी विविध स्पर्धा परीक्षा मध्ये यश मिळवलेले अनिता वसंत गुंजाळ (जलसंपदा विभाग). तेजस सूर्यवंशी (राज्य राखीव दल) आणि डॉ. ऐश्वर्या जाधव (मेडीकल ऑफिसर जुन्नर) यांचा सत्कार करण्यात आला. गावच्या या अनोख्या उपक्रमाच जुन्नर तालुक्यातून कौतुक होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे