रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल व जैन श्रावक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर

1 min read

आळेफाटा दि.१३:- रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल, जैन श्रावक संघ आळेफाटा यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद ऋषीजी म.सा यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आळेफाटा (ता.जुन्नर) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 8 या वेळेत, सावतामाळी महाराज मंदिर, आळेफाटा येथे संपन्न होणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास ‘इयरबड’ भेट देण्यात येणार आहे.या शिबिरासाठी डॉक्टर असोसिएशन आळेफाटा.

संत सावता महाराज देवस्थान आळेफाटा, आळेफाटा व्यापारी असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल चे अध्यक्ष विद्या ज्ञानेश जाधव, सरिता महावीर पोखरणा (उपाध्यक्ष, रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल).

सोनाली सुमतीलाल गांधी (सेक्रेटरी, रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल), संतोष नेमिचंद कोठारी (अध्यक्ष जैन श्रावक संघ, आळेफाटा), सुनील भंडारी (उपाध्यक्ष, जैन श्रावक संघ, आळेफाटा), स्मितलाल गांधी (सेक्रेटरी, जैन श्रावक संघ,आळेफाटा) व प्रोजेक्ट इन्चार्ज डॉ. मनीषा शिंदे (श्री हॉस्पिटल आळेफाटा) यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे