‘बेल्हेश्वर आशीर्वाद फाउंडेशन’ च्या वतीने जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

1 min read

बेल्हे दि.११:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर १ (ता.जुन्नर) येथे बेल्हेश्वर आशीर्वाद फाउंडेशन च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये करंज, बहावा जांभूळ, चिंच, आंबा अशा तेरा वृक्षांची उपयोगी लागवड करण्यात आली. तसेच यासाठी संरक्षक जाळ्याही उपलब्ध करून दिल्या. यापूर्वी शाळेमध्ये लावलेल्या वृक्षांकडे बघून बेल्हेश्वर आशीर्वाद फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी बेल्हेश्वर आशीर्वाद फाउंडेशनचे मुख्य प्रवर्तक सुनील चोरे, गणेश चोरे, अध्यक्ष स्वप्निल शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य दादाभाऊ मुलमुले, प्रितम मुंजाळ ,शेखर पिंगट इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपण कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष नारायण पवार सामाजिक कार्यकर्ते किशोर अभंग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेतील विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा,एक मूल एक झाड, कावळा करतो काव काव, माणसा माणसा झाडे लाव अशा घोषणा देत या उपक्रमात सहभाग घेत श्रमदान केले.

शाळेतील उपशिक्षक हरिदास घोडे व संतोष डुकरे यांनी श्रमदान करत या कार्यक्रमाची नियोजन केले. तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचे यासाठी सहकार्य लाभले. शाळेमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करून वृक्ष लागवड केल्याबद्दल शाळेचा मुख्याध्यापिका मिरा बेलकर व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सुप्रिया बांगर यांनी बेल्हेश्वर आशीर्वाद फाउंडेशनचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे