व्ही.जे.इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात संपन्न
1 min read
नगदवाडी दि.१५:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही.जे.इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विशाल जुन्नर सेवा मंडळाचे ज्येष्ठ सभासद पाराजी कृष्णाजी बोरचटे तसेच उमेश पांडुरंग अवचट माजी-सुभेदार मेजर व शिवाजीराव रामचंद्र पाटे माजी-वॉरंट ऑफिसर हे उपस्थित होते. तसेच विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे उपस्थित होते. या निमित्त ‘ध्वजारोहणाचा सन्मान’ प्रमुख पाहुण्यांनी भूषवला. कार्यक्रमासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे खजिनदार- शिवाजी बांगर, विश्वस्त- विक्रांत काळे, विश्वस्त- संपत काने, विश्वस्त- दिलीप चासकर, सहकारी विश्वस्त- महेंद्र शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
तसेच विशाल जुन्नर सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष अशोक सोनवणे, ज्येष्ठ सभासद सहादू सोनवणे, ज्येष्ठ सभासद पांडुरंग गहिणे, ज्येष्ठ सभासद अनंत सोनवणे देखील आवर्जून उपस्थित होते. तसेच पालक- शिक्षक संघाचे उपाध्यक्ष किशोर काकडे तसेच पालक- शिक्षक संघातील काही सदस्य मान्यवर व पालकही उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर, मान्यवरांच्या उपस्थितीत परेडचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी सादर केले. इ.6 वी व इ.7 वी तील विद्यार्थिनींनी स्वागत गीताने सभेची सुरुवात केली. मनीषा हांडे व किरण मुळे या शिक्षिकांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.
व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. इ.5 वी व इ.7 वी मधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. वृंदा गनिंगा, साईश्री खिल्लारी, स्वरा डोमाले व दिव्यांग आहेर या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध विषयावर भाषणे केली. देशभक्तीपर गीताचे गायनही इ.6 वी व इ.7 वी मधील विद्यार्थ्यांनींनी केले.
अध्यक्ष विशाल जुन्नर सेवा मंडळ अंकुश सोनवणे यांनी आपले मनोगत भाषणाद्वारे व्यक्त केले. तर प्रमुख पाहुण्यांच्या वतीने माजी- सुभेदार मेजर उमेश अवचट यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘विद्यार्थ्यांसाठी रायफल शुटिंग ट्रेनिंग’या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे, संस्थेचे अध्यक्ष व इतर मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. शस्त्राचे पूजन व प्रात्यक्षिकही करण्यात आले. तसेच रायफल शुटिंगमध्ये प्राविण्य मिळवणारी स्कूलची इ.10 वी तील विद्यार्थिनी इशिता काकडे हिने शाळेला एक छानशी भेटवस्तु ही सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत देऊन शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या शिक्षिका पुनम लेंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी समन्वयिका सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले.
कार्यक्रमासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे सन्मा. अध्यक्ष अंकुश सोनवणे व सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.