दिलीप वळसे पाटील महाविद्यालय विविध कार्यक्रम
1 min read
निमगाव सावा दि.१५:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन श्रीहरी भालेराव यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या आणि देशभक्तीपर गीतांचे गायन केले. यावेळी मुस्कान साह, साक्षी गाडगे, साक्षी निकम, साईनाथ कोयमहाले, मणियार रुबीना या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे वर्णन केले. या कार्यक्रम प्रसंगी संत सेवक सखाहरी खाडे यांनी आपल्या मनोगतामधून आई-वडिलांची सेवा करून तसेच आपल्या देव देवतांची पूजा आणि धर्मरक्षणाचे कार्य आणि स्वातंत्र्यवीरांनी मिळवून दिलेल्या स्वातंत्र्यात आपल्या कर्तृत्वाने ताठ मानेने जगून इतिहास घडवावा असा संदेश महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिला.
याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, श्रीहरी भालेराव, निमगाव सावा चे सरपंच किशोर घोडे, संस्थेचे अध्यक्ष संदीपान पवार, सुदर्शन गाडगे, सकाहरी खाडे, संदीप थोरात, विशाल भालेराव, योगेश गाडगे, निवृत्ती पवार, कविता पवार, गावातील ग्रामस्थ, पालक आजी-माजी विद्यार्थी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.