श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

1 min read

रानमळा दि.१५:- श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल, रानमळा (ता.जुन्नर) येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रानमळा गावचे सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध उद्योजक निलेश म्हातारबा बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदाम जगताप यांनी प्रास्ताविक करुन कार्यक्रमास सुरुवात केली. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कैलास रभाजी जगताप (माजी सैनिक) यांनी भूषाविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मालुंजकर यांनी तर सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन माया माळवे व जयश्री थोरात यांनी केले. संतोष कर्डक यांनी अनुमोदन दिले. तसेच विद्या औटी यांनी आभार व्यक्त केले.या प्रसंगी रानमळा ग्रामस्थ, परिसरातील सर्व नागरिक, विद्यालयाचे माजी विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदि मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे