मॉडर्न मध्ये भास्कर पवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण
1 min read
बेल्हे दि.१५:- बेल्हे (ता. जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. संस्थेचे संचालक भास्कर पवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या वेळी देशभक्तीपर विविध कार्यक्रम संपन्न झाले. परेड, देशभक्तीपर गीते, नृत्य, भाषणे असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे संचालक भास्कर पवार, राम गटकळ, विश्वस्त दावला कणसे.
गणेश गुंजाळ, बबन औटी, प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के. पी सिंग पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना बेल्हे ग्रामपंचायतच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले.