स्वातंत्र दिनी समर्थ शैक्षणिक संकुलात माजी सैनिकांचा सन्मानसोहळा
1 min read
बेल्हे दि.१५:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे “सन्मान माजी सैनिकांचा भारतमातेच्या वीर सुपुत्रांचा” या कार्यक्रमांतर्गत माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट चे प्राचार्य डॉ.सतीश गुजर, बीसीएस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार.
ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर,जुन्नर तालुका माजी सैनिक संघटना व शिवनेरी माजी सैनिक संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी,सदस्य माजी सैनिक दिलीप आरोटे,कॅप्टन महादेव हाडवळे,सुभेदार मेजर ऑनररी लेफ्टनंट उमेश अवचट,गोपीनाथ कसाळ, गोपीनाथ कुटे,एकनाथ वाजगे,निवृत्त हवालदार रमेश खरमाळे,भास्कर डोंगरे.
हवालदार शिवाजी पाटे,हवालदार संभाजी वाळुंज,नाईक संतोष घोडके,हवालदार हरिश्चंद्र कोल्हे,अरुण वऱ्हाडी,किसन ढवळे,वीरमाता चंद्रकला जाधव,ज्ञानदेव थोरवे,दामोदर घोलप,साईनाथ झिंजाड,सलीम युसुफ, नायक शिवाजी चौधरी,हवालदार संतोष काळे, बाळासाहेब मुळे,विलास जाधव,
हवालदार दत्तात्रय आरोटे,दत्तात्रय मुरादे,मच्छिंद्र घोलप.कोंडाजी गुंजाळ,होनाजी गुंजाळ,नवनाथ गाढवे तसेच आर्मी नेव्ही,एयर फोर्स मधील सेवानिवृत्त अधिकारी व माजी सैनिक उपस्थित होते.यावेळी राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या माध्यमातून हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत तिरंगा रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये संकुलातील विद्यार्थी-विद्यार्थिनी व माजी सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.माजी सैनिकांबद्दल कृतज्ञतेच्या भावनेतून व आदराप्रति दरवर्षी समर्थ संकुलात या स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. भारतीय सैनिकांच्या शौर्याची गाथा खरंतर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कोरली जायला हवी अशी आहे.
अभूतपूर्व साहस,जाज्ज्वल्य देशाभिमान,दुर्दम्य इच्छाशक्ती,नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर एकीकडे अपुरा शस्त्रसाठा,प्रतिकूल निसर्ग आणि दुसरीकडे अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यांवर मात करत,आपल्या जिवाची तमा न बाळगता शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणारे भारतीय सैन्याचे वीर जवान देशाची खरी संपत्ती आहे.
आजच्या तरुणाईपुढे शूरवीर जवानांच्या अपार शौर्याची कहाणी मांडताना सर्वसामान्य माणसामध्ये व सैनिकांमध्ये एक सुंदर भावबंध निर्माण करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन आपल्या शिक्षणाचा उपयोग देशसेवेसाठी करावा.पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येक विद्यार्थ्याने,नागरिकाने एक तरी झाड लावून स्वतःची आणि पुढच्या पिढीची काळजी घ्यावी.
असे प्रतिपादन माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी केले.
सैनिकांप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीवदेखील तितकीच महत्वाची आहे.आपले वीरयोद्धे सार्या देशाची जबाबदारी घेऊन देदीप्यमान देशप्रेमाच्या, कर्तव्याच्या भावनेतून मी माझ्या देशाची सेवा करणार म्हणून तिथे लढतात.आपल्या लष्करी बांधवांना,आपल्या सैनिकांना कोणत्या अवघड परिस्थितीत कशा तर्हेच्या कठीण हवामानात किती काळ राहावं लागतं. याबाबतचे अनुभव यावेळी माजी सैनिकांनी विद्यार्थ्यांपुढे विशद केले.आपण ज्या ठिकाणी शिकतो,काम करतो त्या ठिकाणी आपापली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडून नियमांचे पालन करणे ही देखील एक देशसेवाच असल्याचे यावेळी सुभेदार मेजर उमेश अवचट यांनी सांगितले.विद्यार्थी म्हणून आपलं कर्तव्य देश संघटित करणे,सर्वांचा सन्मान करणे,आपले वागणे,बोलणे यात सुसंस्कृतपणा असावा.
वाहतुकीचे नियम पाळणे,मोबाईल चा वापर मर्यादित व योग्य कारणासाठी करणे या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करणे म्हणजेच विद्यार्थ्यांनी देशसेवा केल्यासारखे असल्याचे सुभेदार मेजर उमेश अवचट यांनी सांगितले.
सैन्यातील शिस्त आणि नियम याबाबत बोलताना गोपीनाथ कुटे म्हणाले की,आमच्या मुलांवर आम्ही कोणतीच जबाबदारी सोपवत नाही.उलट त्यांना पायी नको चालूस,गाडी घेऊन जा म्हणत गाडीच्या चाव्या हातात देतो,मोबाईल घेऊन देतो.त्यांना या वयात सारं आयतं मिळत असतं आणि मग आम्ही या वयातल्या मुलांना आपल्या जबाबदारीची जाणीव नाही असं म्हणतो.त्याच मुलांच्या वयात आपले वीरयोद्धे सार्या देशाची जबाबदारी घेऊन देदीप्यमान देशप्रेमाच्या, कर्तव्याच्या भावनेतून मी माझ्या देशाची सेवा करणार म्हणून तिथे लढतात.
आपल्या तिरंग्याची आण,बाण शान ही आताच्या तरुणांच्या हातात आहे.त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन माजी सैनिक कॅप्टन गोपीनाथ कसाळ यांनी केले.यावेळी कॅप्टन महादेव हाडवळे,ज्ञानदेव थोरवे, भास्कर डोंगरे,बाळासाहेब मुळे यांनी देखील आपले अनुभव विद्यार्थ्यांपुढे व्यक्त केले.माजी सैनिकांचे चित्तथरारक अनुभव ऐकताना सर्वांच्या अंगावर शहारे उमटत होते.
उपस्थित सर्व माजी सैनिकांचा संस्थेच्या वतीने शाल व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी शहिद जवानांना श्रद्धांजली वाहून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी,प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी तर आभार क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी मानले.