समर्थ अभियांत्रिकीच्या ११ विद्यार्थ्यांना “क्यू स्पायडर” या कंपनीमध्ये नोकरी

1 min read

बेल्हे दि.१३:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे (ता.जुन्नर) या अभियांत्रिकी महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांची क्यू स्पायडर या कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.सतीश गुजर यांनी दिली.

कॅम्पस ड्राईव्ह २०२४ अंतर्गत क्यू स्पायडर या कंपनीच्या वतीने कॉप्यूटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन, मेकॅनिकल, सिव्हिल इंजीनियरिंग विद्यार्थ्यांसाठी मुलाखतीचे आयोजन नुकतेच समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे या महाविद्यालयात करण्यात आले होते.क्यू स्पायडर ही जगातील सर्वात लोकप्रिय सॉफ्टवेअर प्रशिक्षण देणारी संस्था आहे. इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूट यांमधील गॅप भरून काढण्यासाठी कालानुरूप बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे व प्रशिक्षण देणे हा या संस्थेचा हेतू आहे. या संस्थेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना जाव्हा फुल स्टॅक, सॉफ्टवेअर टेस्टिंग, पायथॉन फुल स्टॅक आदी प्रकारच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. विविध मल्टीनॅशनल कंपन्यासाठी लागणारे मनुष्यबळ पुरवण्याचे काम ही संस्था करते.कंपनीच्या वतीने चंदना व एस जयश्री यांनी मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली.त्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये सर्व विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेद्वारे कल चाचणी घेण्यात आली. त्यानंतर सांघिक चर्चा व व्यक्तिमत्त्व विकासावर आधारित मुलाखत घेण्यात आली. संवाद कौशल्य,सांघिक भावना, विश्लेषणात्मक विचारांची ओळख, सॉफ्ट स्किल ज्ञान आणि विषयाबाबतचे ज्ञान या घटकांचा विचार करून विद्यार्थ्यांची निवड केल्याची माहिती बँगलोर येथील क्यू स्पायडर ट्रेनर मधुश्री रघुरामा यांनी दिली.
अंतिम टप्प्यातील मुलाखतीमध्ये क्यू स्पायडर पॅनेलने विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्ये, विशेषज्ञता, सॉफ्ट स्किल्स आणि प्रस्तावित पदांसाठी त्यांची एकूण पात्रता तपासली गेली. या मुलाखतींमध्ये सखोल चर्चा आणि व्यक्तिमत्व मूल्यांकनासाठी भरपूर संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्याच दिवशी मुलाखतींचे निकाल जाहीर करण्यात आले आणि ११ उत्कृष्ट उमेदवारांना क्यू स्पायडर मधील विविध पदांसाठी ऑफर पत्रे देण्यात आली.
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:आकाश आगळे,मयूर चिकणे, प्रज्वल एलभर,घनश्याम गुंड, आदित्य गुंजाळ,वैभव होंडे,जयेश कुमार नायर.वैष्णवी शेळके,अश्विनी शिंदे,संतोष वाघमारे व सिद्धांत वाकचौरे.सदर मुलाखतीचे यशस्वी नियोजन करण्यासाठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख प्रा.स्नेहा शेगर,ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.सचिन पोखरकर,प्रा.सिद्धेश गडगे यांनी परिश्रम घेतले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,सर्व संस्थांचे प्राचार्य,विभागप्रमुख व शिक्षक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे