दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा

1 min read

निमगाव सावा दि.१२:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मध्ये डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील ग्रंथपाल मंगल उनवणे यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्म 12 ऑगस्ट 1892 रोजी मद्रास प्रांतातील तंजावार जिल्ह्यातील शियाळी या गावी झाला. डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे पूर्ण नाव डॉ. शियाळी रामामृत रंगनाथन. ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचे संग्रहालय न राहता ती एक संस्था व्हावी. म्हणून अहोरात्र झिजणाऱ्या डॉ.एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिन आहे. ग्रंथालयाला जास्तीत जास्त लोकाभिमुख बनवत त्याचा फायदा सर्वसामान्य व्हावा यासाठी त्यांनी ग्रंथालयाची पंचसूत्री तयार केली. त्या आधारावरच ग्रंथालय शास्त्राचा पाया रचला गेला. आज भारतामध्ये ग्रंथालय आणि माहिती शास्त्र मध्ये जी प्रगती दिसत आहे त्यामध्ये सर्वाधिक मोठे योगदान डॉ .रंगनाथन यांचे आहे. त्यामुळे त्यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे पितामह म्हटले जाते.डॉ.एस.आर. रंगनाथन , यांनी 1928 मध्ये मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना करून भारतातल्या सार्वजनिक ग्रंथालय चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. 1931 मध्ये त्यांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ “द फाइव लॉज ऑफ लायब्ररी सायन्स ” प्रसिद्ध झाला. भारतीय ग्रंथालयाची चौकट रंगनाथन यांनी दिलेल्या या पाच सिद्धांतावरच अवलंबून आहे 1)ग्रंथ हे वाचण्यासाठीच असतात 2) प्रत्येक वाचकांसाठी पुस्तक मिळाले पाहिजे 3) प्रत्येक पुस्तकाला वाचक मिळाला पाहिजे 4) वाचकांचा ग्रंथपालांचा वेळ वाचावा.

5)ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे (सातत्याने वाढ होणारी).1948 मध्ये दिल्ली विद्यापीठाने आणि 1964 रोजी अमेरिकेतील पीटर बर्ग विद्यापीठाने डि.लीट.ही बहुमानाची पदवी देऊन गौरविले. त्यानंतर ग्रंथालय शास्त्रातील त्यांच्या अद्वितीय कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना ग्रंथालय शास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे यांनी ग्रंथपाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नंदा आहेर आणि ज्योती गायकवाड यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे