शरदचंद्र पवार अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅक ‘ए’ नामांकन
1 min readओतूर दि.११:- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक संस्थेचे शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग महाविद्यालय हे इसवी सन 2009 पासून डुंबरवाडी ओतूर (ता.जुन्नर) येथे कार्यरत आहे. महाविद्यालयांमध्ये पदवी शाखेच्या चार शाखा आहे. त्यात कम्प्युटर इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन, मेकॅनिकल इंजीनियरिंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग व पदवीत्तर पदवीमध्ये कम्प्युटर इंजीनियरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमनिकेशन इंजीनियरिंग या दोन शाखा आहेत. महाविद्यालयास ग्रामीण भागातील सर्वोच्च महाविद्यालय म्हणून सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून सन 2018 मध्ये गौरवण्यात आले आहे. मागील पंधरा वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेच्या आधारावरती महाविद्यालयाने नावलौकिक मिळवले आहे. सामान्यातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल या ध्येयाने सुरू झालेल्या या महाविद्यालयाचे नुकत्याच नॅक च्या झालेल्या परीक्षणामध्ये मूल्यांकन समितीने महाविद्यालयास ” ए ” हा दर्जा दिला. समितीने केलेल्या परीक्षणामध्ये सर्व बाबींवर महाविद्यालयाची कामगिरी ही उजवी ठरली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी प्राचार्य, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले. तसेच अध्यक्षांनी प्राचार्य डॉक्टर गोविंद खरात यांच्या कामाचे विशेष कौतुक केले तसेच संस्थेचे सचिव वैभव तांबे यांनी ही प्राचार्य, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले. व शेवटी शुभेच्छा दिल्यानंतर एक शेर म्हणाले, मंजिले उन्ही को मिलती है|जिनके सपनो मे जान होती है | पंखो से कुछ नही होता| होसलो से उड्डाण होती है| महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोविंद खरात यांनी सर्व श्रेय हे महाविद्यालयाच्या व्यवस्थापनास दिले व त्यांचे सहकार्य व मार्गदर्शन हे अति महत्त्वाचे होते. असे सांगितले तसेच महाविद्यालयाचे आय क्यू एस सी कॉर्डिनेटर डॉक्टर मोनिका रोकडे, कंप्यूटर विभागाचे डॉक्टर सुनील खताळ, इलेक्ट्रॉनिक विभागाचे प्रमुख प्राध्यापक नीता बाणखेले, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्राध्यापक सचिन जाधव तसेच कार्यालयाचे अधीक्षक विशाल बेनके व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.