जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मंगरूळ च्या प्रतिक्षा भोजने ची जलसंपदा विभाग “सहाय्यक अभियंता” पदी निवड
1 min readबेल्हे दि.१०:- मंगरूळ (ता.जुन्नर) येथील प्रतिक्षा बाळासाहेब भोजने या युवतीने स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश संपादन करून महाराष्ट्र शासन, पाटबंधारे विभागाच्या “सहाय्यक अभियंता” पदी नुकतीच नियुक्ती झाली. त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिचा राहत्या घरी सत्कार करण्यात आला. जिद्द, अत्यंत मेहनत आणि चिकाटीने अभ्यास करून प्रतिक्षा ने हे यश संपादन केले. पुणे येथे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रतिक्षा ने प्रचंड मेहनत आणि जिद्दीने हे यश संपादन केले. तीच्या या यशामध्ये आई, वडील आणि भाऊ यांचे खुप मोठे योगदान राहिले आहे. पाट बंधारे विभागात “सहाय्यक अभियंता पदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रतिक्षा हिचे विविध स्तरांतून कौतुक आणि सत्कार सन्मान होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडी, जुन्नर तालुक्याच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश वाव्हळ, प्रा. किशोर चौरे, युवा अध्यक्ष महेश पठारे, उपाध्यक्ष आरीफ मोमीन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी स्वप्नवेध अनाथालयाचे सचिन भोजने,डॉ. आकाश भोजने , ग्रा.प.सदस्य संदीप भोजने, सूर्यकांत भोजने.भारतीय बौध्द महासभेचे जुन्नर तालुका उपाध्यक्ष रवींद्र भोजने,ज्ञानेश्वर नवगिरे,कैलास भोजने,सचिन खळे,भरत भोजने,प्रशिक भोजने,नितीन उदागे,वैभव डुकरे,अशोक भोजने,चंद्रकांत भोजने, विकी भोजने ई. उपस्थित होते. यावेळी प्रा. चौरे सर, गणेश वाव्हळ, यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सचिन भोजने यांनी केले तर सत्काराला उत्तर आणि आभार नवनियुक्त सहाय्यक अभियंता प्रतिक्षा भोजने हिने व्यक्त केले.