कौशल्य विकसित करण्यासाठी तांत्रिक शिक्षण महत्वाचे:- शिक्षणतज्ज्ञ बबनराव गटकळ

1 min read

बेल्हे दि.९:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित समर्थ पॉलिटेक्निक या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच मान्यवरांच्या हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

शिक्षणतज्ज्ञ बबनराव गटकळ यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांच्यासमवेत अनंतराव गटकळ, डी बी गटकळ, बांगरवाडी चे माजी सरपंच जालिंदर बांगर, यशवंत औटी, गणेश हाडवळे आदि मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळा मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२४ मध्ये समर्थ च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत संस्थेच्या यशस्वी वाटचालीत मोलाची भर घातली आहे. तेजस खिलारी-९६ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम तसेच कुणाल दंडवते -९३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर राजेश चव्हाण -९२.५६ टक्के गुण मिळून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

सानिका गायकर या विद्यार्थिनीला गणित या विषयामध्ये ७० पैकी ७० गुण मिळाले. सिद्धी डुंबरे या विद्यार्थिनीला इमर्जिंग ट्रेंड इन कॉम्प्युटर इंजिनियरिंग या विषयांमध्ये ७० पैकी ७० गुण मिळाले. तर राजेश चव्हाण या विद्यार्थ्याला इंडस्ट्रियल हायड्रोलिक अँड न्युमॅटिक,ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग,इंडस्ट्रियल इंजिनियरिंग अँड क्वालिटी कंट्रोल या विषयांमध्ये ७० पैकी ७० गुण मिळाले.

प्रमोद गुंजाळ व अनिकेत दिघे या दोन्हीही विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या विषयांमध्ये ७० पैकी ७० गुण मिळाले. प्रथम वर्षाचा निकाल ९९ टक्के त्याचप्रमाणे द्वितीय वर्ष ९० टक्के व तृतीय वर्षाचा निकाल ९६ टक्के लागला असल्याची माहिती प्रा.संजय कंधारे यांनी दिली.

महाविद्यालयातील १४९ विद्यार्थ्यांना ८० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाल्याची माहिती टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले यांनी दिली. यावेळी ५७ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाळा व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये असलेले कौशल्य विकसित करण्यासाठी तांत्रिक शिक्षण महत्वपूर्ण असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कष्ट,मेहनत व जिद्दीच्या जोरावर तांत्रिक शिक्षणाच्या माध्यमातून आपल्यामध्ये असलेल्या

कौशल्यांचा वापर करून सामाजिक समस्यांवर उपाययोजना करावी असे आवाहन यावेळी शिक्षणतज्ज्ञ बबनराव गटकळ यांनी व्यक्त केला. या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा.संजय कंधारे,मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागप्रमुख प्रा.महेंद्र खटाटे,मेकॅट्रॉनिक्स विभागप्रमुख प्रा.शाम फुलपगारे, कॉम्प्युटर विभागप्रमुख प्रा.स्वप्निल नवले, सिव्हिल विभागप्रमुख प्रा.संकेत विघे,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभाग प्रमुख प्रा.आदिनाथ सातपुते,

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.आशिष झाडोकर यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे,विभागप्रमुख व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले तसेच संकुलातील सर्व प्राचार्य, विभागप्रमुख,शिक्षक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे