मॉडर्न च्या विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी; ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची जनजागृती
1 min read
बेल्हे दि.१४:- जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा ‘ या मोहिमेंतर्गत बालचमुंनी वंदे मातरम, भारत माता की जय, स्वतंत्र दिनाचा विजय असो, एकच नारा हार घर तिरंगा अशा घोषणा देत बेल्हे गावचा परिसर दणाणून सोडला.
तिरंगा ध्वज फडकवण्यास प्रोत्साहित करून नागरिकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.’हर घर तिरंगा’ मोहीम २०२२ मध्ये आजादी का अमृत महोत्सवाच्या बॅनरखाली सुरू करण्यात आली होती.
त्यानिमित्त गावामधून प्रभात फेरी काढून गावातील लोकांना ‘हर घर तिरंगा ‘ हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शाळेच्या प्राचार्या विद्या गाडगे, संस्थेचे विश्वस्त दावला कणसे, उपप्राचार्य के.पी. सिंग, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे तसेच सर्व संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.