समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये शिक्षक-प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
1 min read
बेल्हे दि.४:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे नुकतेच ३ दिवसीय शिक्षक-प्रशिक्षण (फॅकल्टी डेव्हलपमेंट) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ.आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून मान्यवरांच्या उपस्थितीत या तीन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
सकाळच्या सत्रात प्राचार्य डॉ.आनंद कुलकर्णी यांनी “व्यक्तिमत्व विकास व प्रभावी सवांदकौशल्य” या या विषयावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रामध्ये प्रा.राजीव सावंत यांनी शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिक नितीमूल्ये या बाबतचे महत्व विशद केले.अभ्यासक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी, शैक्षणिक लवचिकता, अभ्यासक्रम आणि
फीडबॅक पद्धती, शैक्षणिक प्रक्रिया, गुणवत्ता, मूल्यमापन प्रक्रिया आणि सुधारणा, नवकल्पना आणि संशोधन संस्कृती’ वाढवण्यासाठी संस्थेने दिलेल्या सुविधा यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ.चंद्रशेखर घुले यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि तणाव व्यवस्थापन या दोन्हीचा कसा समतोल साधायचा याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रा.पंकज नागमोटी यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मानसिकता याबाबत सविस्तर चर्चात्मक संवाद साधला. प्रा.देवराव कांबळे यांनी प्रभावी अध्यापनासाठी आधुनिक पद्धतीने अध्यापन कसे करावे तसेच माहिती तंत्रज्ञानाचे प्रभावी अध्यापनासाठीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ.संजय देवकर यांनी अध्यापन अध्ययन पद्धती तंत्र आणि संशोधन याविषयी मार्गदर्शन केले. प्रा.संजय कंधारे व प्रा.शाम फुलपगारे यांनी टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले व समर्थ पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.अनिल कपिले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे संयोजन केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, अभियांत्रिकेचे प्राचार्य डॉ.सतीश गुजर, बीसीएस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, डॉ.लक्ष्मण घोलप, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले, समर्थ गुरुकुल चे
प्राचार्य सतीश कुऱ्हे, क्रीडा संचालक एच पी नरसुडे व संकुलातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संगणक विभागप्रमुख प्रा.स्वप्निल नवले यांनी या कार्यक्रमाचा अभिप्राय घेऊन उपस्थितांचे आभार व्यक्त केले.