व्ही.जे इंटरनॅशनल स्कूल मध्ये रंगला ‘विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण सोहळा’
1 min read
नगदवाडी दि.३:- ‘विशाल जुन्नर सेवा मंडळ’ संचलित व्ही.जे इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण सोहळा’गौरव पूर्ण वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच विश्वस्त लक्ष्मण कोरडे, विश्वस्त विक्रांत काळे आणि सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत आणि परिचय करून देण्यात आला. त्यानंतर इ. 6 वी मधील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. मान्यवरांच्या उपस्थित परेडचे शिस्तबद्ध प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी सादर केले. मान्यवरांच्या हस्ते हेड बॉय, हेड गर्ल, कॅप्टन, व्हाईस कॅप्टन यांना मानचिन्ह देऊन त्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न करण्यात आला.
या विजयी उमेदवारांची नक्की भूमिका व जबाबदारी काय असणार आहे. याविषयी शाळेच्या शिक्षिका सबा शेख यांनी माहिती दिली. उपस्थित मान्यवर विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व विश्वस्त लक्ष्मण कोरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विजयी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमामध्ये आर्यन कालेकर, आरोही काकडे, शौर्य काकडे, गौरी पाचपुते, श्रेया फल्ले, अथर्व भोर, अर्जुन काळे यांनी स्केटिंगचे प्रात्याक्षिक सादर केले. तर ‘हुला हुप्स’ या मध्ये वेदिका अभंग व मनवा कोरडे या विद्यार्थ्यांनींनी सुंदर सादरीकरण करून आपले कौशल्य दाखवून दिले.
यानंतर स्कूलच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना मार्गदर्शन केले. समन्वयिका जयश्री कुंजीर व श्वेता कोकणे यांच्या सहकार्याने सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडली. स्वप्नाली भोर यांनी सर्वांचे आभार मानले.
‘विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण सोहळा’ या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच सन्मा.सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.