दिलीप वळसे पाटील महाविद्यालयाच्या श्वेता करंडे ची पीएसआय पदी निवड
1 min read
निमगाव सावा दि.२:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात तृतीय वर्ष विज्ञान शाखेत 2018-19 मध्ये 74% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली श्वेता सुखदेव करंडे मु पो.काठापुर, ता. आंबेगाव, जि. पुणे या विद्यार्थिनींने अतिशय खडतर अशा संघर्षानंतर पीएसआय पदाला गवसणी घातली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 या परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (599) नुकतीच जाहीर झाली या परीक्षेमध्ये श्वेता करंडे हिने 400 पैकी 294 गुण मिळवून मुलींमध्ये 44 वा रँक मिळविला.
घरची गरिबीची परिस्थिती, असूनही शिकण्याची जिद्द आणि मनाची तयारी करून तसेच शिवाजी शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन व आर्थिक मदत लाभल्याने आणि छोटी बहीण सिद्धी, आई – वडील यांच्या सहकार्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर श्वेताने यश संपादन केले.खरंतर आर्थिक परिस्थिती कमकुवत असूनही मनी जिद्द ठेवून पीएसआय पदाला गवसणी घालून दिलीप वळसे पाटील महाविद्यालयाच्या वैभवात मानाचा तुरा रोवण्याचे काम श्वेताने केल्याने संस्थेचे संस्थापक पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी तिचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे, निमगाव सावा चे सरपंच किशोर घोडे, संस्थेचे सर्व संचालक, संस्था प्रतिनिधी कविता पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे,सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी या यशाबद्दल श्वेताचे अभिनंदन केले.