श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल च्या विद्यार्थांना ‘सायबर सुरक्षा जागरूकतेचे’ धडे
1 min read
रानमळा दि.६:- श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल, रानमळा येथे मा. बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळे व महाराष्ट्र सायबर सेल तसेच क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर सुरक्षा जागरूकता” हा कार्यक्रम घेण्यात आला. दिव्या सुनिल गुंजाळ व माधुरी नवनाथ भुजबळ या स्वयंसेविकांनी विद्यार्थ्याना सायबर गुन्हे व त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत योग्य व अतिशय मौलिक असे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदाम देवराम जगताप, रमेश मालुंजकर, संतोष कर्डक, माया माळवे, जयश्री थोरात, विद्या औटी व सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मालुंजकर यांनी केले तर आभार प्रदर्शन माया माळवे यांनी केले.