विशाल जुन्नर फार्मसी महाविद्यालयाच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम
1 min readआळेफाटा दि.२९:- विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च आळे (ता.जुन्नर) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मे २०२४ बी – फार्मसी सत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
त्यात अंतिम वर्षात प्रथम क्रमांक जठार तनया संतोष ८.५१ CGPA, द्वितीय क्रमांक भुजबळ श्रेया विजय ८.५० CGPA, तृतीय क्रमांक जाधव संचिता सिद्धेश्वर ८.४३ CGPA मिळवून उत्तीर्ण झाले.
तसेच तृतीय वर्षात वर्षात प्रथम क्रमांक हर्षद संदीप इचके ८.१३५ SGPA, द्वितीय क्रमांक साक्षी पोपट काटकर ८.०६५ SGPA तृतीय क्रमांक अदिती अनिल डेरे ८.०४१ SGPA मिळवून उत्तीर्ण झाले.तसेच द्वितीय वर्षात प्रथम क्रमांक मनस्वी मकरंद सोनावणे ८.३५५ SGPA.
द्वितीय क्रमांक प्राजक्ता कैलास भंडलकर ८.३४५ SGPA, तृतीय क्रमांक सानिया अब्दुल लतीफ शय्येद ८.२१ SGPA मिळवून उत्तीर्ण झाले.तसेच प्रथम वर्षात प्रथम क्रमांक सोनाली निलेश कुऱ्हाडे ८.१२५ SGPA, द्वितीय क्रमांक चैताली सुभाष गोरड ७.९४ SGPA, तृतीय क्रमांक तेजस्विनी राजाराम टिकुडवे ७.८५ SGPA मिळवून उत्तीर्ण झाले.
तसेच एम्. फार्मसी मध्ये फार्मास्युटिकल क्वालिटी ॲशुरन्स शाखेत प्रथम क्रमांक प्रणाली कृष्णा अभंग ८.३४५ SGPA, द्वितीय क्रमांक रुपाली राजेंद्र पडवळ ८.३०५ SGPA, तृतीय क्रमांक प्राप्ती अशोक खेमनार ८.१५५ SGPA मिळवून उत्तीर्ण झाले. फार्मास्युटिकस शाखेमध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी बाळासाहेब गुगळे ८.३१ SGPA, द्वितीय क्रमांक ओमकार सोपान मंडलिक ८.२३ SGPA, तृतीय क्रमांक धनश्री शांताराम जाधव ८.१५ SGPA मिळवून उत्तीर्ण झाले. सर्व वर्षा़चा सरासरी निकाल १००% लागला आहे.
विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. डी. गायकवाड, प्रिन्सिपल डॉ. जाधव सर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि सर्व विध्यार्थाना पुढील वाटचालीस शुभेच्छा प्रदान केल्या.