गुळुंचवाडी येथे उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न
1 min read
बेल्हे दि.२९:- गुळुंचवाडी (ता.जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेली सहा वर्षांपासून कार्यरत असणारे उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक ज्ञानेश्वर मच्छिंद्र जाधव यांची आंतरजिल्हा बदली अहिल्यानगर या ठिकाणी झाल्याने त्यांचा कृतज्ञता सोहळा शाळा व्यवस्थापन समिती, समस्त ग्रामस्थ, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.
यावेळी ज्ञानेश्वर जाधव यांचा मानपात्र, भेटवस्तू व पोशाख देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला.जेष्ठ शिक्षिका सरिता मटाले यांनी मानपत्राचे वाचन केले.सन 2007 मध्ये त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्याची सुरवात पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील सणसवाडी या अतिदुर्गम शाळेपासून केली. सन 2018 मध्ये ते ऑनलाईन बदलीने जिल्हा परिषद शाळा गुळुंचवाडी येथे हजर झाले.
गेल्या सहा वर्षात त्यांनी शाळेत विविध शालेय व सहशालेय उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रामाणिकपणे काम केले. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, विविध स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने शालेय भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी परिश्रम घेतले. गावातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली.शालेय क्रीडास्पर्धा, स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, दहीहंडी उत्सव, शालेय मंत्रिमंडळ निवडणूक, सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा उपक्रम, शिवजयंती उत्सव, शिष्यवृत्ती तयारी, आजी आजोबा दिन.
शाळापूर्व तयारी मेळावे अशा विविध उपक्रमांची त्यांनी प्रभावी अंमलबजावणी केली. त्यामुळे विविध स्पर्धामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावर विशेष नैपुण्य मिळवले. नुकतेच त्यांना पंचायत समिती जुन्नर च्या वतीने सन 2023-24 चा गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
पुणे जिल्ह्यात सतरा वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा केल्यानंतर त्यांची आंतरजिल्हा बदली अहमदनगर येथे झाली.त्यांच्या कार्याचा गौरव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, केंद्रप्रमुख व ग्रामस्थ यांनी ज्ञानेश्वर जाधव यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुऱ्हाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आणे केंद्राच्या केंद्रप्रमुख रत्नप्रभा वाकचौरे होत्या. यावेळी अंजनाबाई देवकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगनाथ भांबेरे, उपाध्यक्ष चंचल गुंजाळ, उपसरपंच शांताराम गुंजाळ, बबन काळे, माजी सरपंच वैशाली गुंजाळ.
विठ्ठल गुंजाळ,दत्ता गुंजाळ, शांताराम भांबेरे, हनुमंत पवार, सुषमा भांबेरे,विठ्ठल खिलारी, लक्ष्मण गुंजाळ, जिजाभाऊ काळे, सुनिल जाधव, वर्षा गुंजाळ,दिपक जाधव, अनिल गुंजाळ, निवृत्ती देवकर,संतोष गुंजाळ, शिक्षणा फौंडेशन चे सदस्य, रामदास संभेराव, सुभाष दाते, विजय चव्हाण, महेश साबळे,अशोक बांगर,सरिता मटाले.
ज्योती फापाळे, नूरजहाँ पटेल,गावातील तसेच विठ्ठलवाडीतील ग्रामस्थ,पालक व महिला मोठया प्रमाणावर उपस्थित होत्या. सहा वर्षांमध्ये शाळेचे मुख्याध्यापक सविता कुऱ्हाडे, दौलत बांगर यांच्या प्रेरणा, विश्वास व प्रोत्साहन यामुळे तसेच सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांसाठी चांगले काम करता आले.
तसेच कोणतेही काम करताना वेळ, परिश्रम व पैसा याचा विचार न करता आनंदाने व सकारात्मक दृष्टीने केल्यास नक्कीच यश मिळते असे ज्ञानेश्वर जाधव यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले व आपला गौरव केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुऱ्हाडे, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांचे आभार मानले.
ज्ञानेश्वर जाधव यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. जुन्नर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, बेल्हे बीटचे शिक्षणविस्तार अधिकारी विष्णू धोंडगे, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे.
माजी अध्यक्ष विकास मटाले,जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे सभापती संतोष पाडेकर यांनी ज्ञानेश्वर जाधव यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.अशोक बांगर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर ज्योती फापाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.