दिलीप वळसे पाटील कॉलेजचे माजी विद्यार्थी डीवायएसपी दीपक शेलार यांच, वर्धापन दिनी मार्गदर्शन
1 min read
निमगाव सावा दि.२८:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या १५ वा वर्धापन दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात. आला याप्रसंगी महाविद्यालयाचा विद्यार्थी दीपक किसन शेलार यांची पोलीस उपअधीक्षक पदी नियुक्ती झाल्याने. त्यांचा शाल पुस्तक व सन्मानचिन्ह देऊन संस्थेचे संस्थापक पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.आपण सर्व ग्रामीण भागातील आहोत, त्याचा फायदा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना नक्की होतो.
ग्रामीण भागातील मुले शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असतात त्याला सुयोग्य, नियोजित अभ्यासाची जोड मिळाली की हीच मुले पुढे येतात. कष्ट, मेहनत करा. महाविद्यालयात उपलब्ध सुविधांचा उपयोग करा. ग्रंथालयातील स्पर्धा परीक्षा पुस्तके अभ्यासा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून मला अभिमान आहे.
आपल्यासाठी अनेक सोयी सुविधा महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याचा लाभ घ्यावा. तुम्ही सर्वांनी मोठे स्वप्न ठेवा यश नक्कीच मिळते. असे प्रतिपादन डी. वाय. एस. पी. दीपक शेलार यांनी महाविद्यालय वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
या वेळी सन २०२३-२४ मधील विद्यापीठीय परीक्षेत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या वैभवी भोजने, हर्षदा बोऱ्हाडे, माया बोंबे, अजिंक्य गुंजाळ, योगेश शिंदे, पटेल मुस्कान, तांबे निकिता, समरीन पठाण, मुस्कान पटेल या गुणवंत विद्यार्थ्यांचा डीवायएसपी शेलार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी दीपक शेलार यांची डीवायएसपी पदी नियुक्ती हा महाविद्यालयाच्या वैभवात भर घालणारा मानाचा तुरा असल्याचे सांगितले. यावेळी गौरी सरजीने, प्रीती भोर,माया बोंबे, तांडेल अलिषा या विद्यार्थ्यांनी तसेच प्रा. अनिल पडवळ.
गणपत घोडे गुरुजी, प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, संस्थेचे माजी सचिव गणपत घोडे गुरुजी, संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे, प्रतिनिधी कविता पवार, सामाजिक कार्यकर्ते संभाजी चव्हाण.
प्राचार्य प्रल्हाद शिंदे, सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी, पालक आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका मोनिका जाधव, प्रास्ताविक प्रा. सुभाष घोडे आणि प्रा.प्रियांका डुकरे यांनी आभार मानले.