बेल्हे जिल्हा परिषद शाळेत पालक मेळावा उत्साहात संपन्न
1 min read
बेल्हे दि .२८:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर १ (ता.जुन्नर) शाळेत प्रथम सत्रातील पालक मेळावा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुप्रिया बांगर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला होत्या. अनेक पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यामध्ये प्रथमच जिल्हा परिषदेतील मुलांसाठी स्पोकन इंग्रजी सुरू करण्याचा निर्णय पालकांनी घेतला. मुलांची स्पर्धा परीक्षांची अधिक तयारी व्हावी यासाठी मंथन प्रज्ञाशोध ऑलिंपियाड इत्यादी स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्याचे ठरले.विद्यार्थ्यांचा घरचा अभ्यास पालकांनी कशा प्रकारे घ्यावा याबाबत अधिक मार्गदर्शन उपशिक्षक संतोष डुकरे यांनी मार्गदर्शन केले .शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा बेलकर यांनी शाळेच्या आर्थिक जमाखर्चाचा आढावा दिला. शाळेमध्ये सुरू असलेल्या मिशन बर्थडे उपक्रम बद्दल अधिक माहिती देत उपशिक्षिका सुवर्णा गाढवे यांनी पालकांना धन्यवाद दिले.
शालेय व्यवस्थापन समितीची पुनर्रचना याप्रसंगी करण्यात आली.याबाबत उपशिक्षक हरिदास घोडे यांनी पुनर्रचनेबाबत नियमावली सांगत मार्गदर्शन केले. त्यानुसार इयत्ता पहिली मध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची निवड सर्वांनुमते करण्यात आली.
इयत्ता पहिली मधील पायल प्रवीण सोनवणे, सोनाली अजय मटाले, संदीप खोमणे व इयत्ता तिसरी मधील पालक प्रीतम मुंजाळ यांची निवड शालेय व्यवस्थापन समितीमध्ये नव्याने करण्यात आली. तसेच शाळेला 5 k.v क्षमतेचे सोलर पॅनल कंपनी मार्फत उपलब्ध करून दिले.
याबद्दल दैनिक सकाळचे पत्रकार अर्जुन शिंदे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. इयत्ता पहिलीतील नवीन विद्यार्थ्यांना व शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या इतर नवीन विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट ड्रेस देण्याचे सहकार्य प्रकाश पिंगट यांनी सांगितले.
या प्रसंगी त्यांचा सन्मान शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सोहेल बेपारी व शिक्षणतज्ञ विलास पिंगट यांनी केला. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य दादाभाऊ मुलमुले यांचा करत असलेल्या उत्तम कामाबद्दल सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या वैशाली मटाले, मनीषा बांगर, शितल गुंजाळ शेखर पिंगट इत्यादी याप्रसंगी उपस्थित होते. शाळेतील उपशिक्षिका कविता सहाणे, योगिता जाधव, प्रविणा नाईकवाडी, सुषमा गाडेकर, अंजना चौरे यांचे नियोजनात सहकार्य मिळाले.