सकारात्मक दृष्टिकोन आणि निरोगी शरीर हीच खरी यशाची गुरुकिल्ली:- माजी सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ
1 min read
बेल्हे दि.२८:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित, समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे येथे “चला आनंदाने शिकूया, स्वतःला घडवूया’ या विषयावर नुकतेच एकदिवसीय मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे चे माजी सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.त्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून या एकदिवसीय मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर.
कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, क्रीडा संचालक एच पी नरसुडे तसेच सर्व विभागाचे प्राचार्य,विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अनिल गुंजाळ म्हणाले कि,जीवनात अनेक वेळा अपयश येते त्याला न घाबरता.
दडपण न घेता आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास करा. सकारात्मक दृष्टिकोन आणि निरोगी शरीर हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे यावेळी अनिल गुंजाळ यांनी सांगितले. “परीक्षेला सामोरे जाताना” विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायचा याबद्दल अनिल गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले व चर्चात्मक संवाद साधतं विचारमंथन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शाल, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संगीता रिठे यांनी प्रास्ताविक प्राचार्या वैशाली आहेर यांनी तर आभार प्रा.रोकडे सर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.संतोष पोटे, प्रा.राजेंद्र नवले, प्रा.सुरेखा पटाडे, प्रा.विनोद चौधरी यांनी परिश्रम घेतले.