विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बोटा कॉलेज ला ‘उत्तम श्रेणी’ प्रदान

1 min read

बोटा दि.२६:- आळेफाटाजवळील पुणे-नाशिक महामार्ग रोडवरील विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर बोटा (ता.संगमनेर) या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई मार्फत करण्यात आलेल्या बाह्य संस्था सर्वेक्षण मध्ये ‘उत्तम श्रेणी’ प्रदान करण्यात आली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ तेजस पाचपुते यांनी दिली.दरवर्षी घेण्यात येणाऱ्या पर्यवेक्षणातून कॉलेजला शिक्षणासाठी दर्जा दिला जातो, यासाठी कॉलेजमधील भौतिक सुविधा, उत्तम शिक्षण पद्धती, अनुभवी शिक्षक वर्ग, ग्रंथालयातील सोयी सुविधा. मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुविधा, महाविद्यालयीन निकाल, विद्यार्थ्यांचा सर्वांनी विकासासाठी राबवण्यात येणार्या सर्व उपक्रम जसे पोस्टर प्रेझेंटेशन, प्रश्नमंजुषा, मॉडेल मेकिंग अशा अनेक गोष्टी तपासल्या जातात. या सर्वच गोष्टींमध्ये विद्या निकेतन कॉलेज नेहमीच अग्रेसर राहिले आहे. या सर्व गोष्टींची पाहणी व छाननी करून या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी उत्तम श्रेणी प्रदान केली आहे. या यशामध्ये संस्थेचे अधक्ष, संचालक, पदाधिकारी, शिक्षक वर्ग प्रा.लामखडे शुभम. प्रा.देशमुख राजश्री, प्रा.चौघुले आशिया, प्रा.डांबे आरती, प्रा.कुरकुटे दिपाली, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोठे योगदान असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ तेजस पाचपुते यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे