समर्थ बीबीए व बी कॉम च्या १४ विद्यार्थ्यांची एचडीएफसी बँकेत नोकरीसाठी निवड
1 min read
बेल्हे दि.२६:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स अंतर्गत सुरू असलेल्या बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (बीबीए-आय बी) व बी कॉम या पदवी अभ्यासक्रमातील शेवटच्या वर्षातील १४ विद्यार्थ्यांची एचडीएफसी बँकेमार्फत नोकरीसाठी निवड करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ.उत्तम शेलार यांनी दिली.
बँकेत नवीन खाती ओपन करणे, चेक तयार करणे,एटीएम वितरित करणे,कर्ज प्रकरणे व त्या संदर्भातील आवश्यक माहिती यावर आधारित प्रश्न मुलाखती दरम्यान विचारण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये असलेला आत्मविश्वास,संभाषण कौशल्य,सॉफ्ट स्किल त्याचप्रमाणे काम करण्याची पद्धत या बाबींचा विचार करून सदर विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.गणेश बोरचटे यांनी दिली.
समर्थ शैक्षणिक संकुलात बीबीए व बी कॉम या अभ्यासक्रमाची ही पहिलीच बॅच असल्याकारणाने ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या वतीने एचडीएफसी बँक,कोटक, महिंद्रा बँक त्याचप्रमाणे अनेक कंपन्यांशी प्लेसमेंट च्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आलेले होते. त्यामध्ये एचडीएफसी बँकेमध्ये या विद्यार्थ्यांची निवड झाल्याने पालकवर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे: किशोर आहेर,सोनाली आहेर, शर्मिला चौधरी,पूर्वा देशमुख, वैष्णवी घाडगे,वैष्णवी गायकर,वैष्णवी लाड,राजश्री पवार,पूजा रसाळ,अमृता रोकडे,शुभम शेळके,वेदिका येवले,सृष्टी गांजे, चेतना शिंदे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,डॉ.लक्ष्मण घोलप तसेच सर्व विभागातील प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.