‘शिक्षण सप्ताह मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिन’ या उपक्रमाविषयी गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांचे मार्गदर्शन

1 min read

खेड दि.२५:- खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धाबेवाडी (नायफड) ता. खेड येथे मंगळवार दि.२३ रिजी भेट दिली. भेटीदरम्यान शिक्षण सप्ताह मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिन या उपक्रमाविषयी अमोल जंगले यांनी मार्गदर्शन केले. याबरोबरच विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर गरजेची व अवगत असलेल्या भाषांपैकी जपानी भाषेचे अनुवाद विद्यार्थ्यांनी सांगितले. भाषा, गणित, इंग्रजी याविषयीचे प्रश्नांची विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली. याबाबत अमोल जंगले यांनी समाधान व्यक्त केले. शालेय अभिलेखे याबाबत सूचना देण्यात आल्या व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमांसाठी डेहणे बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी जीवन कोकणे व नायफड केंद्राचे केंद्रप्रमुख भास्कर बुरसे यांनी मार्गदर्शन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे