समर्थ संकुलात डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ व लेबर लॉ सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाची परवानगी
1 min read
बेल्हे दि.२४:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ लॉ कॉलेज बेल्हे या विधी महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून “डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ” व डिप्लोमा ईन लेबर लॉ” हे प्रत्येकी एक वर्षाचे अभ्यासक्रम सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने नुकतीच परवानगी दिल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.
डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ (DTL) हा कर आकारणीच्या क्षेत्रातील १ वर्षाचा डिप्लोमा प्रोग्राम आहे. आयकर, जीएसटी, कर नियोजन, कायदेशीर बाबी, कर अनुपालन इत्यादी विषय या अभ्यासक्रमात शिकवले जातात. कोणत्याही शाखेमधून पदवी प्राप्त विद्यार्थी डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ आणि डिप्लोमा इन लेबर लॉ या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात.व्यवसायाच्या संधींच्या दृष्टीने लेबर लॉ डिप्लोमा हा भारतातील सर्वात जास्त मागणी असलेला अभ्यासक्रम आहे.उत्तम संभाषण कौशल्ये, उत्कृष्ट संगणक कौशल्ये आणि उत्तम निरीक्षण कौशल्ये ही या अभ्यासक्रमाची काही वैशिष्ट्ये आहेत.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना कर संग्राहक, कर व्यवस्थापक, प्रमाणित सार्वजनिक लेखापाल, आर्थिक सल्लागार, मुख्य वित्तीय अधिकारी आणि कर विश्लेषक म्हणून नोकरी व व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे प्राचार्य डॉ.सुनील कवडे यांनी सांगितले.
सदर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य अशा पद्धतीने असणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी प्रा.शिवाजी कुमकर- ९९६०९६५८५० यांना संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.