दरड कोसळल्याने भीमाशंकर रस्ता वाहतुकीसाठी बंद

1 min read

घोडेगाव दि.२५:- भीमाशंकर रस्त्यावर मोरोशी फाटा येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. या बाबत खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी तातडीने सबंधित प्रांत अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली आहे. रिमझिम पावसामुळे आज दिनांक 25 रोजी सकाळी ही घटना घडली. सदर ठिकाणी तातडीने दरड हटवून रस्ता सुरु करण्याबाबत सूचना खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केल्यामुळे शक्यतो घराबाहेर पडणे टाळा. तसेच जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे