गुरुपौर्णिमेनिमित्त व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून प्रथम गुरू आईचे पूजन
1 min read
वडगाव कांदळी दि.२४:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित, व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल, कांदळी येथील आवारात ‘गुरुपौर्णिमा’ उत्साहात साजरी. या प्रसंगी शाळेतील नर्सरी, ज्युनिअर, सिनियर व इ. पहिली या वर्गातील विद्यार्थ्यांच्या माता-पालकांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते.
सर्वप्रथम शाळेच्या शिक्षिका धनश्री गवळी यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. तर प्रतिभा टेमगिरे व वर्षा सोनवणे यांनी गुरुपौर्णिमेची माहिती सांगितली. स्कूलच्या प्राचार्य जयश्री तांगतोडे, समन्वयिका जयश्री कुंजीर, श्वेता कोकणे व उपस्थित माता-पालक सखुबाई मारुती काळे, सविता शिवाजी बढे, सविता सदाशिव हांडे यांच्या हस्ते ‘सरस्वती पूजन’ करण्यात आले.
यानंतर ‘माता ही आपली प्रथम गुरु’ असते.म्हणून इ.नर्सरी ते इ.पहिली मधील सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या मातांचे पूजन करून त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. संगीत शिक्षक निलेश शेळके यांनी ‘आईची महती’ सांगणारे एक सुरेल गीत सादर केले. “मातृ देवो भव” हे पटवून देण्यासाठी शाळेने आयोजित केलेला ‘मातृ पुजन’ कार्यक्रम स्तुत्यपूर्ण होता.
इ. दुसरी ते इ. दहावी मधील सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्ग शिक्षकांच्या पाया पडून गुरुचे आशीर्वाद घेऊन गुरुपौर्णिमा साजरी केली. शिक्षिका किरण मुळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.