पोखरीच्या स्वप्नील पवार ने केले शेतकरी आई- वडिलांचे स्वप्न पूर्ण; पहिल्याच प्रयत्नात SRPF पदी निवड
1 min readपारनेर दि.२९:- पोखरी (ता.पारनेर) गावचा स्वप्निल पवार ह्याची एसआरपीएफ पदी निवड झाली असून गावातून पहिलाच मुलगा एसआरपी पदी निवड झालेला तरुण ठरला आहे. त्याने पोलीस SRPF ग्रुप १९ गटांमध्ये ५ क्रमांक पटकावला असून हे यश त्याने पहिल्याच प्रयत्नात मिळवले.
स्वप्निल हा शेतकरी कुटुंबातील असून आई अलका पवार व वडील गणपत पवार यांनी खूप कष्ट घेऊन सप्नीलला शिक्षणासाठी नगर या ठिकाणी पाठवले. कोरडवाहू शेती असल्याने उत्पन्न काहीही नव्हते. वडिलांनी रोजंदारी करून सप्नीलला सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सर्व गरजा भागवत प्रोत्साहन दिले.
व कुठलीही आर्थिक अडचण भासू दिली नाही. स्वप्निल चे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा पोखरी (ता. पारनेर) या ठिकाणी झाले व उच्च शिक्षण न्यू आर्ट्स कॉलेज अहमदनगर या ठिकाणी पूर्ण केले. त्यानंतर तो शिक्षण घेत असताना एमपीएससी तयारी करू लागला.
त्यानंतर बहीण शुभांगी मोरे हिने तिच्या घरीच चाकण या ठिकाणी नेले व तेथे त्याने सह्याद्री करिअर अकॅडमी जॉईन केली. सप्नील ने सहा महिने शारीरिक चाचणीची तयारी केली. लेखी परीक्षेत १०० पैकी ९७ गुण मिळवले तर मैदानी चाचणीत १०० पैकी ७७ गुण मिळवले.
रविवार दि.२८ जुलै रोजी लागलेल्या निवड यादीत स्वप्नांची निवड झाली असून पुढच्या महिन्यात ट्रेनिंग सुरू होणार आहे.पोखरी गावातील शिक्षकांनी खूप मार्गदर्शन केले तसेच चाकण येथील ढेरंगे सर यांचे स्वप्निल ला चांगले मार्गदर्शन लाभले व मेहनत व जिद्दीच्या जोरावर एक सरकारी नोकर होण्याचे आई-वडिलांचे खूप स्वप्न पूर्ण केले.
या यशात स्वप्निलला कुटुंब, चुलते, चुलत भाऊ, मावशी काका, व बहिणी व भाऊजी यांचे परीक्षा देण्यासाठी खूप मोटिवेट केले.त्याचबरोबर गावचे सरपंच,उपसरपंच व इतर मान्यवर यांनी ही परीक्षा देण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.नातेवाईक मित्र परिवार यांनी स्वप्निलचे अभिनंदन केले.