भारतीय बौद्ध महासभेची वर्षावास प्रवचन मालिका जुन्नर येथे संपन्न
1 min read
जुन्नर दि.२४:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत शाखा देहूरोड, मावळ, मुळशी, जुन्नर खेड, आंबेगाव, आळंदी यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिका 2024 उद्घाटन सोहळा आंबा अंबिका अंबालिका लेणी खानापूर (ता.जुन्नर) येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रवचनकार भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव आयु. राजेश पवार हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद भारतीय बौद्ध महासभेचे पुणे जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष आयु प्रकाश ओव्हाळ यांनी भूषविले.
या कार्यक्रमासाठी पुणे, मावळ, मुळशी, देहूरोड, आळंदी, खेड, आंबेगाव, जुन्नर येथील सर्व पदाधिकारी तर तालुक्यातील मान्यवर बौद्ध उपासक उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभेला ज्या धम्म उपासकांनी सहकार्य केले.
त्या मान्यवरांचा विशेष पुरस्कार सन्मान चिन्ह सन्मानपत्र देऊन भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष आयू. राकेश डोळस व संपूर्ण कार्यकारणीचा वतीने सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत आंबेगाव तालुक्याची अध्यक्ष आयुका साळवे गुरुजी खेड तालुक्याचे अध्यक्ष पिके पवार यांनी केले.
सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे पुणे जिल्हा पश्चिम चे सरचिटणीस आई भगवान शिंदे यांनी केले उपस्थित मान्यवरांचे आभार पुणे जिल्हा पश्चिमचे संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आयु. अशोक कडलक गुरुजी यांनी मानले.