जेवणात करा ‘या’ डाळीचा समावेश; मूतखडा व रक्तातली साखर जाईल निघून
1 min read
जुन्नर दि.२३:- स्थूलपणा, मूतखडा, रक्तातली साखर, कोलेस्ट्रॉल, इत्यादींवर कुळीथ डाळ अत्यंत उपयुक्त असते. या डाळीमुळे आरोग्याला प्रचंड फायदे होतात. शिवाय आहारात आपण सहज या डाळीचा समावेश करू शकतो.
माणसांच्या विविध आजारांचे उपाय आपल्या किचनमध्येच असतात. आपल्या जेवणातला प्रत्येक पदार्थ हा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतो.आपल्याला केवळ त्याचे फायदे माहित नसतात,इतकंच. कुळीथ (हुलगे) डाळही त्यापैकीच एक.कुळीथ डाळीत फायबर आणि प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीर सुदृढ राहतं. विशेषतः मूतखड्यावर ही डाळ फायदेशीर असते. शरिरात लपलेले मूतखडे ती सहज बाहेर फेकते. त्यामुळे मूतखड्यांचा असह्य त्रास सहन करण्यापेक्षा आहारात कुळीथ डाळीचा समावेश करणं उत्तम. विशेष म्हणजे या डाळीमुळे रक्तातलं साखरेचं प्रमाणही नियंत्रणात राहतं.
तसंच अन्नपचन सुरळीत होऊन कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होण्यास मदत मिळते.कुळीथ डाळीमुळे वजन सहज कमी होऊ शकतं. विशेष म्हणजे या डाळीचे आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. परंतु फायदे मात्र भरपूर होतात. डॉ राघवेंद्र चौधरी सांगतात की, मूठभर कुळीथ डाळ जवळपास अर्धा लिटर पाण्यात रात्रभर भिजवत ठेवावी.
सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्यावं आणि डाळ चावून खावी. या डाळीचं चूर्ण बनवूनही आपण खाऊ शकता. हे चूर्ण दूध किंवा पाण्यासोबत घ्यावं. आपण कुळीथ डाळीची भाजी बनवूनही खाऊ शकता. विविध प्रकारे कुळीथ डाळीचं सेवन करू शकता. यामुळे शरिराला भरपूर फायदे मिळतात.