विद्यानिकेतनमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; विद्यार्थांनी केली गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त

1 min read

साकोरी दि.२१:- विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी व पी.एम.हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज साकोरी (ता.जुन्नर) मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले विद्यानिकेतन संकुलनाचे एच ओ डी गणेश करडीले यांनी प्रतिमापूजन केले. संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग साळवे हे देखील उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी गुरुपुजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला. ज्युनिअर के.जी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून गुरूंचे महत्त्व गोष्टीरूपात सांगितले. त्यानंतर शिक्षक तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष यांची भाषणे झाली.

या मंगल प्रसंगी विद्यार्थ्यांनी पर्यावरण, निसर्ग, पशू-पक्षी, पुस्तके, इंटरनेट, संगणक, शाळा, शिक्षक अशा सर्व सजीव, निर्जीव गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करू, अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन व पसायदानाने झाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी च्या प्राचार्या रुपाली पवार (भालेराव ) व पी एम हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य रमेश शेवाळे तसेच शाळेच्या सांस्कृतिक विभागाने (C.C.A) विभागाने केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे