तृप्ती हाडवळे व प्रज्ञा हाडवळे यांचा गणेश सहकारी दूध संस्थेकडून सत्कार
1 min read
राजुरी दि.२३:- राजुरी गावचे मा. सरपंच व संस्था सभासद बाळासाहेब हाडवळे यांची कन्या तृप्ती बाळासाहेब हाडवळे तसेच राजुरी गावचे प्रगतशील शेतकरी व सभासद संपत गणपत हाडवळे यांच्या सुनबाई प्रज्ञा वैभव हाडवळे यांची मिरा -भाईंदर आयुक्तालय मुलींच्या खुल्या प्रवर्गातून सर्वाधिक गुण मिळवून.
महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेबद्दल त्यांचा गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्या. राजुरी (ता. जुन्नर) यांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी संस्था चेअरमन, संचालक मंडळ, सभासद व कर्मचारी वृंद उपस्थित होते.