विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनची बैठक संपन्न:- जिल्हा अध्यक्ष पांडुरंग पवार
1 min read
पुणे दि. १९:- राष्ट्रीय जिल्हा परिषद व पंचायत समिती असोसिएशन महाराष्ट्र राज्य कार्यकारणीची बैठक पुणे येथे नुकतीच संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय जिल्हा परिषद व पंचायत समिती असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास गोरे पाटील हे होते.
या बैठकीत सर्वानुमते विविध मागण्या मांडण्यात आल्या.यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्वरित घ्याव्यात, जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्त करावेत, जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण यांची रचना व आरक्षण १० वर्ष कायम ठेवावे. स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानसभेवर निवडून द्यावयाच्या निवडणुकीसाठी उमेदवार मतदार यादीतील असावा. स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या उमेदवारांना मत देण्याचा अधिकार पंचायत समिती सदस्य व नगरपंचायत समिती सदस्यांना असावा. अशा विविध मागण्या या बैठकीत मांडण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरिता गाखरे (वर्धा), कार्याध्यक्ष उदन बने (रत्नागिरी), गोपालराव कोल्हे (अकोला), शरद बुट्टे पाटील (पुणे), अविनाश गलांडे पाटील (छत्रपती संभाजीनगर), अरुण बालटे (सांगली), जय मंगल जाधव (जालना). शिवा सांबरे (पालघर), सुभाष घरत (ठाणे), भारत आबा शिंदे (सोलापूर) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी दिली.