दिलीप वळसे पाटील यांच्या तत्परतेने घोणस विषारी साप चावलेल्या शेतकरी रुग्णाचे प्राण वाचले
1 min read
शिरूर, दि.१८:- शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील ताराचंद (काका) कोहकडे यांना शेतात काम करत असताना घोणस चावला होता. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या तत्परतेमुळे त्यांचे प्राण वाचले आहेत.
कोहकडे यांना घोणस हा विषारी साप चावल्याने त्यांना तातडीने शिरूर येथील एका खाजगी हॉस्पिटल येथे घेऊन जात त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु केले होते. परंतु त्यांना शुगर, बीपी असल्यामुळे त्यांच्या पायाला सूज आली होती. त्यानंतर चोरे डॉक्टरांनी सांगितले की, जोपर्यंत पेशंटची शुगर नॉर्मल होत नाही.
तोपर्यंत पेशंटला अडत नावाचे इन्जेक्शन प्रत्येक तासाला एक असे २४ तासांत २४ इन्जेक्शन द्यावे लागतील. त्यानंतर पेशंटचे नातेवाईक आजुबाजुच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये गेले. त्यांना फक्त दहा इन्जेक्शनच उपलब्ध झाले. त्यानंतर पेशंटचे पुतणे अजित कोहकडे यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना तातडीने संपर्क करून याची कल्पना दिली. वळसे पाटील यांच्याशी बोलून झाल्यानंतर लगेच १० मिनीटांमध्ये त्यांना वळसे पाटील यांचे पीए रामदास पाटील यांचा फोन आला.
मंचरला या. जे इन्जेक्शन हवे आहेत, ते घेऊन जा, असा निरोप मिळाला. तातडीने ते इंजेक्शन घेऊन पेशंटला देण्यात आले. त्यामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत झाली.
“जे इंजेक्शन नव्हते. ते सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधून तप्तरतेने २४ अडत इंजेक्शन उपलब्ध करुन दिले. त्यामुळे आम्हाला मोठा आधार मिळाला. पेशंटला धोक्याबाहेर काढण्यास मदत झाली. आम्ही वळसे पाटील यांचे आभारी आहोत.
अजित कोहकडे, रुग्णाचे पुतणे