पोलीस दलात निवड झालेल्या तरुनींचा राजुरीत सन्मान
1 min read
राजुरी दि.१६:- महाराष्ट्र शासन गृह विभाग यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या पोलीस भरती परीक्षेत राजुरी (ता.जुन्नर) येथील तृप्ती बाळासाहेब हाडवळे व प्रज्ञा वैभव हाडवळे यांनी दैदीप्यमान यश मिळवून त्यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली.
त्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ राजुरी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवडीने राजुरी गावाचा तसेच त्यांच्या कुटुंबाचा नावलौकिक नक्कीच वाढला असून त्यांनी निवड झाल्यावर यावर शांत न बसता सेवतील अथवा तत्सम प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देत यापुढील वरिष्ठ पदे मिळावावी अश्या शुभेच्छा ग्रामनेते दिपक आवटे यांनी दिल्या.
कार्यक्रम प्रसंगी ग्रामनेते दिपक आवटे, जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक लक्ष्मण घंगाळे, राजुरी गावच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, माजी सरपंच व विद्यमान सदस्य एकनाथ शिंदे, एम डी घंगाळे, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य चंद्रकांत जाधव,
ग्रामपंचायत सदस्य सखाराम गाडेकर, गौरव घंगाळे, शाकीर चौगुले, शितल हाडवळे, रुपाली औटी माजी सरपंच बाळासाहेब हाडवळे, संपत हाडवळे, निलेश हाडवळे, नितीन औटी सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी सरपंच एकनाथ शिंदे, एम.डी घंगाळे यांनी मनोगत व्यक्त केली तर सरपंच प्रिया हाडवळे यांनी यशस्वी महिलांचे अभिनंदन तर उपस्थितांचे आभार मानले.