आळे ग्रामस्थांचे कल्याण- नगर महामार्गावर वृक्षारोपण
1 min read
आळेफाटा दि.१६:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात कल्याण – नगर महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असुन हे थोकादायक असलेले खड्ड्यामंध्ये वारंवार अपघात होत असुन यामध्ये विशेष करून आळे येथील बस स्टँड च्या २ किलोमीटर परिसरात अनेक धोकादायक पडले आहेत. हा खड्डा वाहनचालकांना त्वरित दिसत नसल्याने अनेक वाहने या खड्यात जाऊन आदळतात. येथे दिवसाआड अपघात होत आहे. या निषेधार्थ येथील ग्रामपंचायतीच्या वतीने पंचायत समीतीने माजी सदस्य गंगाराम गुंजाळ, गावच्या सरपंच सविता भुजबळ, उपसरपंच मंगेश कु-हाडे.
बाजीराव लाड दिंगबर घोडेकर, बाळशिराम कु-हाडे, माऊली शेजवळ, योगेश कोते, मंगल कु-हाडे, संजू शेजवळ आदी ग्रामस्थांच्या उपस्थित खड्ड्यांमध्ये झाडे लावण्यात आली. खड्ड्यांची दुरुस्ती तात्काळ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.