आईच्या तेराव्या निमित्त वृक्षारोपण; शाळा व मंदिरासाठी आर्थिक मदतीचा हात; शेलार कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी 

1 min read

पिंपळवंडी दि.१५:- कै. उज्वला अनिल शेलार यांच्या तेराव्या दिवशी सुहासिनी कार्यक्रमानिमित्त अनिल शेलार, राहुल शेलार, कपिल शेलार, श्रीकान्त शेलार व शेलार कुटुंबियांकडून पिंपरी पेंढार सोशल फाउंडेशन, रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रल,

आळेफाटा व्यापारी असोसिएशनच्या सहकाऱ्यांनी नवलेवाडी येथील वनराई मध्ये वृक्षारोपणाचे आयोजन केले होते. त्यानिमित्त इत्यादी विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

केशर आंबा, चिक्कू, फणस, सिताफळ चिंच, पेरू, वड, पिंपळ इत्यादी विविध ६१ झाडांचे वृक्षारोपण शेलार कुटुंबीयांकडून करण्यात आले.

कुटुंबियांकडून या रोपांच संगोपन केले जाणार आहे. वृक्षारोपणाचे कार्यक्रमांमध्ये विमलेश गांधी, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब खिल्लारी, प्रमोद ढगे, संजय ढगे यांचे विशेष सहकार्य लाभले. यानिमित्त शेलार कुटुंबीय आप्तेष्ट नातेवाईक उपस्थित होते.

कै.उज्वला अनिल शेलार यांच्या स्मृती प्रित्यर्थ मळगंगा माता मंदिरासाठी स्टीलचे बैठक बाकडे, श्री पिंपळेश्वर देवस्थान साठी बैठक बाकडे, जिल्हा परिषद शाळा पिंपळवंडी साठी आर्थिक मदत करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे