आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र बांगरवाडी स्वयंभू गुप्त विठोबा देवस्थानचे यंदा ही चोख नियोजन; यात्रे निमित्त रक्तदान शिबिर

1 min read

बेल्हे दि.१४:- जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावाच्या उत्तरेस सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये वसलेल्या श्री क्षेत्र बांगरवाडी स्वयंभू गुप्त विठोबा देवस्थान (प्रतिपंढरपूर) येथे १७ जुलै आषाढी महाएकादशी सोहळा संपन्न होत आहे. दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. सकाळी ६ वाजता महापूजा झाल्यावर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येईल दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत परिसरातील दिंड्यांचे स्वागत करण्यात येईल. दिवसभर देवस्थानच्या व अन्नदात्याच्या माध्यमातून जवळ जवळ साडेतीन टन खिचडी महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. दिवसभर भजन सायंकाळी हरिपाठ होईल. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी दर्शन रांगेत घ्यावे व देवस्थानच्या नियमांचे पालन करावे अशी विनंती देवस्थानचे अध्यक्ष नकाजी बांगर यांनी केले आहे. तसेच सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. असून या रक्तदान शिबिरासाठी पुना ब्लड बँक सेंटर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास गरज भासल्यास मोफत रक्त मिळणार आहे. तसेच रक्तदात्याच्या नातेवाईकास रक्ताची गरज भासल्यास विशेष सवलतीच्या दरात रक्त उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन पुना ब्लड बँकेच्या वतीने देण्यात आले आहे.

रक्तदान करण्याची गरज का आहे कारण रक्त फक्त मानवी शरीरातच तयार होते रक्ताला पर्याय काही असू शकत नाही. रक्तदानामुळे गंभीर आजारातील व्यक्ती शस्त्रक्रिया किंवा बाळंतपणात रक्त गमवलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासते. रक्तदानामुळे आपण एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो त्यामुळे रक्तदान श्रेष्ठदान असे देखील म्हटले आहे.या दिवशी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी रक्तदान करुन पुण्य कर्म करावे असे आव्हान श्रीक्षेत्र गुप्त विठोबा देवस्थान व समस्त ग्रामस्थ बांगरवाडी मुंबईकर व पुणेकर मंडळी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे