कृतज्ञता सोहळ्या निमित्त बोरी खुर्द मधील ६६ भजनी मंडळींना पोशाख वाटप

1 min read

बोरी खुर्द दि.१३:- जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी कृतज्ञता सोहळ्या निमित्त बोरी खुर्द येथील ६६ भजनी मंडळींना पोशाख वाटप करण्यात आले. बोरी खुर्द येथील कमलामाता भजनी मंडळ, विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ, हनुमान सेवा मंडळ गावठाण या सर्व मंडळांना वाटप करण्यात आले. या वेळी गावच्या सरपंच कल्पना काळे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र काळे, ग्रामपंचायत सदस्य गोरख शेटे, सामाजिक कार्यकर्ते वैभव काळे, विजय काळे, अशोक काळे, किसन महाराज घुले, सुरेश शिंदे, बाळशीराम पटाडे आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आमदार अतुल बेनके यांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे