राज्यातील पहिल्या निवासव्यवस्था असलेल्या एसटी बस स्थानकाचे उद्घाटन; खर्च 33 कोटी रुपये; ३४ फलाट; १ हजार लोक निवास क्षमता
1 min read
पंढरपूर दि.१६:- राज्यातील पहिल्या बसस्थानक कम निवासव्यवस्था असलेल्या बस स्थानकाचे उद्घाटन उद्या आषाढी एकादशी च्या दिवशी पंढरपूरात होणार आहे. या अद्यावत बस स्थानकाला लागूनच यात्री निवास बांधण्यात आले आहे. या यात्री निवासामध्ये एकाच वेळी सुमारे 1 हजार यात्रेकरू राहू शकतात.
हा राज्यातील एसटी महामंडळाचा पहिलाच प्रकल्प असून त्यासाठी 33 कोटी रुपये खर्च आला आहे. या बस स्थानकावरून आषाढी आणि कार्तिक यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी राज्यभरातील सर्व ठिकाणी एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत.
पंढरपूरमधील या भव्य प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. पंढरपूरला दररोज येणाऱ्या भाविक- यात्रेकरूंची निवासाची अल्प दरात सोय व्हावी या दृष्टीने हे निवासव्यवस्था असलेले बस स्थानक बांधण्यात आले आहे.
राज्यातील पहिले ३४ फलाटाचे अति- भव्य स्थानक आहे. आषाढी आणि कार्तिकी सारख्या मोठ्या यात्रेसाठी ते बसस्थानक अपुरे पडत होते. म्हणून एसटी महामंडळाकडून ११ हेक्टर जागेवर ३४ फलाटाचे अति भव्य चंद्रभागा यात्रा बस स्थानक निर्माण करण्यात आले आहे.
याबरोबरच पंढरपूरला दररोज येणाऱ्या भाविक- यात्रेकरूंची निवासाची अल्प दरात सोय व्हावी या दृष्टीने बस स्थानकाला लागूनच यात्री निवास बांधण्यात आले आहे.