लाडकी बहीण ‘ योजने नंतर ‘लाडका भाऊ ‘ योजनेची आज पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
1 min read
पंढरपूर दि.१७:- राज्य सरकारने काही दिवसांपुर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत. दरम्यान लाडका भाऊ योजना का नाही? अशी विचारणा विरोधकांकडून केली जायची.
याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरातून प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादषीनिमित्त पहाटे पंढरपूरच्या विठुरायाची शासकीय पूजा केली. यानंतर त्यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. त्यामुळे आता बहिणींसोबत आता भावांच्या खात्यातही पैसे जमा होणार आहेत.
महायुती सरकारच्या कार्यकाळातलं शेवटचं अधिवेशन काल पार पडलं. अधिवेशनादरम्यान, विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. लाडकी बहीण योजना आणल्यानंतर लाडका भाऊ योजना काढा असं विरोधकांकडून म्हणण्यात येत होतं.
त्यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर देताना,’सख्ख्या भावाला कधी जवळ केलं नाही आणि लाडका भाऊ योजना काढा म्हणतात,असे खोचक उत्तर दिले. त्याशिवाय, लाडका भाऊ योजनाही आणली. त्यामुळे आता राज्यातील तरूणांना सरकारकडून काही खास सवलती आणि फायदे मिळणार आहेत.
लाडका भाऊ योजनेविषयी सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘आम्ही लाडका भाऊ योजना काढली आहे. ज्यात दहा हजारांपर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना अप्रेंटनशिप महिन्याला देणार, डिप्लोमा होल्डरला 8 हजार आणि बेरोजरांगाना स्टायपेंड देण्याचा निर्णय घेतला आहे.’
दरम्यान, राज्यात बेरोजगार तरुणांसाठी सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे.या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे.
प्रशिक्षणार्थींना १२ वी पास ६ हजार, आयटीआय/पदविका ८ हजार आणि पदवीधर, पदव्युत्तर यांना १० हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. परंतु, ही योजना फक्त राज्यातील केवळ तरुणांपुरतीच मर्यादित नसून तरुणीही या योजनेस पात्र आहेत.
या योजनेच्या अटी खालील प्रमाणे आहेत.
1) तरुणांचे वय हे 18 वर्ष ते 35 वर्ष या दरम्यान असावेत. 2) उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी 12 वी असावीत. 3) अर्जदार उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. 4) उमेदवाराची आधार नोंदणी असने बंधनकारक आहे. 5) उमेदवाराचे आधार लिंक बॅक खाते असावे.
6) उमेदवाराने कोशल रोजगार व उद्योजकता आयुक्तांच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे. शिक्षण पूर्ण केलेल्या आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करुन प्रशिक्षणासाठी गेलेल्या तरुणांना प्रशिक्षण कालावधी सहा महिने तरुणांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दर महिन्याला खालील प्रमाणे वेतन दिले जाणार आहे.