रक्षाबंधनला लाडक्या बहिणीच्या खात्यावर तीन हजार जमा होतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

1 min read

बारामती दि.१५:- राज्य सरकारने गरिबांसह शेतकर्यांना मदत करण्यासाठी विविध योजना राबविण्याचा निर्णय घेतला. महिलांकरिता मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी योजना आणली. यातील त्रुटी देखील दूर केल्या आहेत. दोन महिन्याचे ३ हजार रुपये ऑक्टोंबरमध्येच रक्षाबंधनाच्या काळात बँकेच्या खात्यावर तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. आजची सभा राष्ट्रवादीची आहे.

मात्र, लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह महायुतीच्या सहकार्यांच्या उपस्थितीत सभा घेतल्या जातील. महायुती आणि मित्र पक्षांच्या सभा प्रत्येक विभागात जिल्ह्यात होणार आहेत. योजना जाहिर करताना आम्ही कुणालाही वंचित ठेवले नाही.

बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीने मिशन हायस्कूल ग्राउंडवर जनसन्मान मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचा बारामतीचा विचार केल्यास बारामतीमध्ये साधारण वर्षाला १८० कोटींची रक्कम मिळणार आहे.

पुढे ही योजना चालणार आहे, हौसे, नवशे गवशे येतील, काही सांगायचा प्रयत्न करतील. पण अजित पवार शब्दाचा पक्का आहे. तो बदलणार नाही. ४४ लाख शेतकऱ्यांना १४ हजार कोटी वीजबिल माफ केले आहे. आता शेतकर्यांना महावितरणचे अधिकारी वीज बिल भरायला सांगायला येणार नाहीत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे