फायनलसम्राट बैलगाडा मालक कांताराम शिंदे; पराक्रमी बैलांवर मुलांप्रमाणे लावतात जीव

1 min read

केंदूर दि.९:- कनेरसर केंदूर च्या सीमेवर पाचवड वस्ती आर आर कॉलनीतील कांताराम शिंदे या प्रगतीशील शेतकऱ्याचा बैलगाडा प्रसिद्ध असुन अनेक गावांतील बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक व फायनल चा मानकरी ठरला आहे.अशा नामांकित, आपल्या पराक्रमी बैलांवर मुलांप्रमाणे माया करुन जीव लावणारया या कुटुंबातची माहिती मिळाली, म्हणून सर्व बैलगाडा मालक, शौकिन, यात्रा कमिटया यांच्याशी कित्येक वर्षे रुणानुबंध असल्याने कांताराम शिंदेंच्या कुटुंबाचं कौतुक करण्यासाठी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख सुरेखा निघोट आणि भारतीय विद्यार्थी सेना मा तालुका प्रमुख प्रा अनिल निघोट यांनी त्यांच्या बैलांच्या दावणीस भेट दिली. लहान मुलं,मुली सुद्धा बैल सोडुन कसे फिरवुन आणतात. बैलांना त्यांचा कीती लळा लागलाय, एक शेतकरी कुटुंब परीवारातील सदस्या प्रमाणे त्यांची कशी काळजी घेतात, जणु हे शर्यत जिंकणारे बैल त्यांचा जीव की प्राण! हे पाहुन ऐकून त्यांचे कौतुक करून ईतरांनाही अशीच प्रेरणा देत रहा, असं सांगून घरी बोलावून, सन्मानाची वागणूक दिली. म्हणून सुरेखा निघोट यांनी आभार मानले. यांचे पाच भावांचे कुटुंब असुन कांताराम शिंदे यांचे पत्र्या ऊर्फ देवा, आणि राजा तर शांताराम शिंदे यांचे लक्ष्या व बंटया अरुण शिंदे यांच्याकडेही एक असे प्रथम क्रमांकात पळणारे बैल असुन सभापती नवनाथ होले. संदिप सांडभोर, दिपक गोरे, कैलास गाडगे यांच्या बरोबर पाईप, खेडकेसरी, कनेरसर, करंजविहीरे,वडगाव काशिंबेग, जऊळके अशा नामवंत बैलगाडा शर्यतीत फायनल जिंकणारा बैलगाडा म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे त्यांच्या दहावी, बारावी शिकणाऱ्या ऐश्वर्या आणि करीना या मुली घाटात बैलगाडा जुंपण्याचं काम करतात, तो ही बैलगाडा शौकीनांत कौतुकाचा विषय ठरत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे