कै. उज्वला अनिल शेलार यांचा दशक्रिया विधी संपन्न; मृत्यू हे अंतिम सत्य:- हभप नागेश्वरीताई झाडे

1 min read

पिंपळवंडी दि.११:- कै. उज्वला अनिल शेलार (वय ६०) वर्ष राहणार पिंपळवंडी ता. जुन्नर जि. पुणे यांचा दशक्रिया विधी गुरुवार दि.११ जुलै रोजी वैकुंठधाम पिंपळवंडी (गावठाण) येथे दशक्रिया विधी संपन्न झाला. यानिमित्त हभप सौ. नागेश्वरीताई झाडे (देवाची आळंदी पुणे) यांचा प्रवचन संपन्न झाले.

त्या प्रवचनात बोलताना म्हणाल्या की, मृत्यू हे अंतिम सत्य असून आयुष्य संपले की जावंच लागतं. शरीराला मर्यादा असतात प्रत्येकावर काळाची झडप पडतेच. जिवंत आहे तोपर्यंत आनंद घ्या. सत्कार्य करा. मृत्यू माणसासाठी अटळ आहे. मृत्यूची वेळ व ठिकाण ठरलेला असतं. त्यामुळे प्रत्येकाला जावंच लागतं.

आई आयुष्यातून निघून गेल्यावर काय अवस्था होते हे पटून सांगितले. तसेच जीवनातील व आईचे व सौभाग्यवती चे महत्व प्रवचनात हभप सौ. नागेश्वरीताई झाडे यांनी सांगितले. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, पंचायत समितीचे माजी सदस्य जयंत घोडके,

शिवसेना नेते मंगेश काकडे, रोटरीचे मोहन पाटील भुजबळ, आळेफाटा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर नरवडे, आळेफाटा व्यापारी असोसिएशनचे संचालक मंडळ सदस्य, यांसह विशाल जुन्नर सेवा मंडळ परिवार, रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल चे अध्यक्ष विजयकुमार आहेर, संचालक मंडळ व सदस्य, रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन चे अध्यक्ष मोहन भुजबळ पाटील, संचालक मंडळ व सदस्य,

पंचायत समितीचे माजी सदस्य महेश काळे, विघ्नहर सहकारी कारखान्याचे मा संचालक बाळासाहेब काकडे, लाला अर्बन बँकेचे उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, संचालक मंडळ सदस्य, राजगुरुनगर सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे, संचालक मंडळ, सदस्य,

जुन्नर बाजार समितीचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रघुनाथ लेंडे, संचालक मंडळ, सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष पिराजी टाकळकर, तेली समाजबांधव, पिंपळवंडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण करून शोक व्यक्त केला.सूत्रसंचालन अरुण वामन, अनिल शेटे, दीपक सोनवणे यांनी केले.

उज्वला शेलार यांच्या पश्चात मुलगा राहुल शेलार, कपिल शेलार, मुलगी सोनाली व्यवहारे, पती अनिल कृष्णाजी शेलार तसेच नातवंडे असा परिवार आहे. उज्वला शेलार ह्या गृहिणी होत्या तर पतीच्या कापड दुकान व्यवसायामध्ये त्यांच मोलाच सहकार्य लाभलं. त्यांच्या अचानक जाण्याने पिंपळवंडी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे