उज्वला अनिल शेलार यांचं दुःखद निधन; उद्या गुरुवारी पिंपळवंडी गावठाण येथे दशक्रिया विधी

1 min read

पिंपळवंडी दि.५:- कै. उज्वला अनिल शेलार (वय ६०) वर्ष राहणार पिंपळवंडी ता. जुन्नर जि. पुणे यांच सोमवार दि १ जुलै रोजी दुःखद निधन झाले असून गुरुवार दि. ११ जुलै रोजी सकाळी ८.१५ वाजता व वैकुंठधाम पिंपळवंडी (गावठाण) ता. जुन्नर येथे दशक्रिया विधी संपन्न होणार आहे.

यानिमित्त हभप सौ. नागेश्वरीताई झाडे (देवाची आळंदी पुणे) यांचा प्रवचन होणार आहे. उज्वला शेलार यांच्या पश्चात मुलगा राहुल शेलार, कपिल शेलार, मुलगी सोनाली व्यवहारे, पती अनिल कृष्णाजी शेलार तसेच नातवंडे असा परिवार आहे.

उज्वला शेलार ह्या गृहिणी होत्या तर पतीच्या कापड दुकान व्यवसायामध्ये त्यांच मोलाच सहकार्य लाभलं. त्यांच्या अचानक जाण्याने पिंपळवंडी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे